हिंदुस्थानची मलेशियावर २-० ने मात

सामना ऑनलाईन । काकामिगाहारा

जपानमध्ये खेळवण्यात येत असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने मलेशियावर २-० अशी मात करीत सलग तिसऱया विजयासह गटात अव्वल स्थान पटकावले. लढतीचा पूर्वार्ध गोलरहित अवस्थेत संपल्यावर उत्तरार्धात वंदना कटारिया (५४ वे मिनिट) व गुरजित कौर (५५ वे मिनिट) यांनी हिंदुस्थानला २-०अशी विजयी आघाडी मिळवून दिली. लढतीच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधण्यासाठीचे मलेशियाचे सर्व प्रयत्न हिंदुस्थानी बचावफळीने उधळून लावले. दुसऱया लढतीत हिंदुस्थानने धोकादायक चीनला ४-१ असे पराभूत केले होते.