१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, पाकिस्तानला हरवत हिंदुस्थान अंतिम फेरीत

सामना ऑनलाईन । ख्राईस्टचर्च

शुभमन गिलचं शानदार शतक आणि इशान पोरेल याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हिंदुस्थानने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना हिंदुस्थानी संघाने २०३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता हिंदुस्थान ३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये खेळवल्या गेलेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीची निवड केली होती. ५० षटकांमध्ये ९ विकेट्स देऊन हिंदुस्थानच्या खात्यात २७२ धावा जमा झाल्या होत्या. पाकिस्तानचा खेळ मात्र ६९ धावांतच आटपल्यामुळे हिंदुस्थानला २०३ इतक्या मोठ्या धावसंख्येने विजय मिळाला. हिंदुस्थानकडून इशान पोरेलने चार तर रयान पराग आणि शिवा सिंह यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. हिंदुस्थानी संघाने ५० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या होत्या. हे आव्हान स्वीकारत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा संघ फक्त ६९ धावांमध्ये तंबूत परतला. यामुळे हिंदुस्थानला २०३ इतक्या मोठ्या धावसंख्येने विजय मिळाला.

हिंदुस्थानने दिलेल्या २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. हिंदुस्थानच्या आग ओकणाऱ्या भेदक गोलंदाजीपुढे पाकड्यांचा निभाव लागू शकताल नाही, पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाने पहिल्या चेंडूपासून सामन्यावर मिळवलेलं वर्चस्व शेवट होईपर्यंत कायम राखलं होतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानी संघाची अशरक्ष: वाताहत झालेली बघायला मिळाली.

या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हिंदुस्थानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार पृथ्वी शॉने ४२ धावांची खेळी केली, तर मनज्योत कालरा ४७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची खेळी केली. शुभमने शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. या स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच शतक आहेत. त्याच्या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने २७३ धावांची मजल मारली. ही धावसंख्या पुरेशी ठरेल का असा प्रश्न काही काळ विचारला जात होता, मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांनी कमाल करत हे लक्ष्य पाकिस्तानसाठी हिमालयाप्रमाणे होते हे दाखवून दिले. हिंदुस्थानी संघाने या विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये. जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानी संघाची आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.