चीन, जपान, कोरियाप्रमाणेच हिंदुस्थानही वर्चस्व गाजवेल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे कास्य व रौप्य पदक पटकावत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते गुरुवारी दोघींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, चीन, जपान व कोरिया या देशांतील खेळाडूंप्रमाणेच हिंदुस्थानचे बॅडमिंटनपटूही वर्चस्व गाजवतील. सरकारकडून अशीच मदत मिळाल्यास यापुढे बॅडमिंटनमध्ये आपलीच सत्ता असेल.