हिंदुस्थान-अमेरिकेत महत्त्वाचा करार, पाकिस्तान-चीनला फुटला घाम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये झालेल्या दोन अधिक दोन (टू प्लस टू) या उच्चस्तरीय बैठकीमध्ये महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे सीओएमसीएएसए हा करार आहे. सीओएमसीएएसए म्हणजे कम्युनिकेशन्स अँड इंर्फोमेशन ऑन सिक्यूरिटी मेमोरेंडम ऑफ अॅग्रीमेंट. 10 वर्षांसाठी हा करार असणार आहे. या करारामुळे हिंदुस्थानचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे (पाणबुडी, शस्त्रास्त्र प्रणाली, ड्रोन प्रणाली इ.) विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जिम मॅटिस आणि संरक्षणमंत्री माइक पॉम्पिओ दोन अधिक दोन (टू प्लस टू) या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे हा या करारांचा मुख्य उद्देश आहे.

विशेष म्हणजे सीओएमसीएएसएचा करार अमेरिकेने नाटो आणि अन्य काही देशांसोबतच केलेले आहे. हिंदुस्थान नाटो देशांचा सदस्य नाही तरीही अमेरिकेने हा करार केल्यामुळे पाकिस्तान आणि चीनला घाम फुटला आहे. या करारामुळे हिंदुस्थानची संरक्षणक्षमता आणि संरक्षणसिद्धता वाढेल असे वक्तव्य संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

एक प्रतिक्रिया