पाकड्यांच्या उलट्या बोंबा; हिंदुस्थान दहशतवाद पसरवतोय

asif-ghafoor

सामना प्रतिनिधी । इस्लामाबाद 

पुलवामा हल्ल्यावरून पाकड्यांनी नेहमीप्रमाणे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत हात वर केले आहेत. उलट पाक लष्कराने चोराच्या उलट्या बोंबा मारीत दहशतवाद हिंदुस्थान पसरवतोय असा आरोप केला आहे.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी लष्कराने आज पत्रकार परिषद घेतली. मेजर जनरल असिफ गफूर यांनी यावेळी हिंदुस्थानविरूद्ध गरळ ओकली. पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाही. हिंदुस्थानात सर्वसाधारण निवडणुका आल्यावर कश्मिरमध्ये हल्ले होतात आणि तेथील शांतता बिघडते, असे अकलेचे तारे गफूर यांनी तोडले.

हिंदुस्थानकडून कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करीत आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक हल्ल्याचे खापर पाकवर फोडले जाते. पुलवामा हे ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. हल्ला करणारा हिंदुस्थानी होता. हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी हिंदुस्थानी होती. दारूगोळा कश्मिरमधील होता. या हल्ल्याशी पाकिस्तानशी संबंध कसा? असे गफूर म्हणाले.

पाकिस्तानात मार्च 2019 मध्ये आठ मोठे इव्हेंट आहेत. अशावेळी कश्मिरमध्ये हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा? असे तारेही गफूर यांनी तोडले आहेत.