पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत हिंदुस्थान तिसरा

63
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थानात नुकतीच अनेक पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्यात आली, तरी अशा वेबसाईटबद्दल हिंदुस्थानींना असणारे आकर्षण फार असल्याचे ‘पॉर्नहब’ या वेबसाईटच्या वार्षिक अहवालामध्ये समोर आले आहे. ‘पॉर्नहब’ वेबसाईटने २०१८ मधील साईटसंदर्भातील डेटा जाहीर केला आहे. त्यातील आकडेवारीनुसार पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्या अव्वल देशांमध्ये हिंदुस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जगभरामधून ही वेबसाईट किती पाहिली जाते, कोठून सर्वाधिक वेळा या वेबसाईटवर नेटकरी येतात, सर्वात जास्त कोणत्या विषयांबद्दल या वेबसाईटवर सर्च केले जाते याची माहिती सदर अहवालामधून समोर आली आहे.

पॉर्नहबच्या अहवालानुसार २०१८ मध्ये वेबसाईटला एकूण ३ हजार ३५० कोटी हिट्स मिळाले आहेत. २०१८ मध्ये दरदिवशी ९ कोटी ९० लाख युझर्सने या वेबसाईटला भेट दिली.

मॉडेल किम कार्दिशनचा १५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ आजही सर्वात लोकप्रिय व्हिडीओंच्या यादीमध्ये अव्वलस्थानी असल्याचे सदर वेबसाईटने म्हटले आहे. या व्हिडीओला दर मिनिटाला ५५ व्ह्यूज मिळतात.

पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्या एकूण युझर्सपैकी ८० टक्के वेबसाईटचे ट्रॅफिक हे टॉप २० देशांमधून येते. हिंदुस्थान आणि जपान वगळता एकाही आशियाई देशाचा या अव्वल २० देशांच्या यादीमध्ये समावेश नाही. पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत कझाकिस्तानने ३३, क्युबाने २६, सीरियाने ३१, कोलंबियाने १७ स्थानांनी आणि तुर्कीने ११व्या स्थानावर उडी मारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या