INDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, कोणाला मिळाली संधी?

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे संघामध्ये कमबॅक झाले आहे. हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 आणि पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 21 तारखेपासून होणाऱ्या टी-20 सामन्याने होणार आहे.

टी-20 संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले असून रोहित शर्मा उपकर्णधाराची धुरा सांभाळेल. यष्टीरक्षक फलंदाज माजी कर्णधार धोनी, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतचाही समावेश संघात करण्यात आला आहे.

टी-20 साठी संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.

एक दिवसीय संघाची धुरा देखील विराटच्या खांद्यावर असून रोहित शर्मा उपकर्णधार असेल. एक दिवसीय संघामध्ये के.एल. राहुलला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानचा संघासाठी दमखम दाखवण्याची ही शेवटची संधी असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेनंतर आयपीएल आणि त्यानंतर लगेचच इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक रंगणार आहे.

पहिल्या दोन दिवसीय सामन्यांसाठी संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, धोनी (यष्टीरक्षक), हार्दिंक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल आणि के.एल. राहुल.

शेवटच्या तीन एक दिवसीय सामन्यांसाठी संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, धोनी (यष्टीरक्षक), हार्दिंक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत आणि के.एल. राहुल.