…तरीही हिंदुस्थान पहिल्या स्थानावर


सामना ऑनलाईन । दुबई

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला इंग्लंडमधील कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने सपाटून मार खावा लागलाय, मात्र तरीही टीम इंडियाचा संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. जो रूटच्या इंग्लंड संघाने मात्र चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

फलंदाजीत विराटच अव्वल

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानला इंग्लंडमध्ये अपयशाचा सामना करावा लागला असला तरी त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. त्याने 59.3च्या सरासरीने 593 धावा चोपून काढल्या. यामुळे त्याला आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कायम राहता आले.