चेतेश्वर पुजाराचे झुंजार शतक, बाकी गळपटले

8


सामना ऑनलाईन, अॅडलेड

ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानी संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 250 धावा केल्या होत्या. सलामीवीरांसह मातब्बर फलंदाजांनी नांग्या टाकल्याने हिंदुस्थानी संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. चेतेश्वर पुजाराने झुंजार शतकी खेळी करत धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणून पोहचवलं. 123 धावा करणाऱ्या पुजाराला पॅट कमिन्सने धावबाद केले.

या सामन्याच्या स्कोअरकार्डवर आपण नजर टाकूयात

 • लोकेश राहुल- 2 धावा
 • मुरली विजय- 11 धावा
 • चेतेश्वर पुजारा- 123
 • विराट कोहली- 3 धावा
 • अजिंक्य रहाणे-13 धावा
 • रोहित शर्मा- 37 धावा
 • रिषभ पंत- 25 धावा
 • आर.अश्विन- 25  धावा
 • इशांत शर्मा-४ धावा
 • मोहम्मद शमी-6 धावा (नाबाद)

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी

 • जोश हेझलवूड- 28 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट
 • नाथन लॉयन-  16 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट
 • मिचेल स्टार्क- 30 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट
 • पॅट कमिन्स-  31 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट

 

आपली प्रतिक्रिया द्या