चहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी

9
युझवेंद्र चहल - 42 धावा 6 बळी (2019, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना)


सामना ऑनलाईन । मेलबर्न

मेलबर्नमध्ये तिसऱ्या आणि निर्णायक एक दिवसीय सामन्यात हिंदुस्थानचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने बळींचा षटकार लगावला. चहलने 10 षटकात 42 धावा देत 6 बळी घेतले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांवर आटोपला. चहलने या कामगिरीच्या जोरावर रवी शास्त्री आणि सकलेन मुश्ताक यांचा विक्रम मोडीत काढला, तर अजित आगरकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.

ऑस्ट्रेलियामध्ये एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर होता. आता या विक्रमाची चहलने बरोबरी केली आहे. अजित आगरकरने 2004 मध्ये मेलबर्नमध्येच 42 धावा देत 6 बळी घेतले होते. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचाच स्टार्क असून 2015मध्ये त्याने हिंदुस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात 43 धावांत 6 बळी घेतले, तर चौथ्या स्थानावर क्रिस वोक्स असून त्याने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 धावात सहा बळी घेतले होते.

फिरकीपटूची सर्वोच्च कामगिरी
चहलने यासह हिंदुस्थानचा माजी खेळी रवी शास्त्री आणि पाकिस्तानचा फिरकीपटू सकलेन मुश्ताकचाही विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियात कोणत्याही फिरकीपटूने एका सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम चहलच्या नावावर जमा झाला आहे. याआधी रवी शास्त्री यांनी 1991 ला पर्थमध्ये 15 धावा देत 5 बळी घेतले होते, तर पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने 1996 मध्ये अॅडलेडमध्ये 29 धावांत 5 बळी घेतले होते.

लक्ष्मणकडून कौतुकाची थाप

आपली प्रतिक्रिया द्या