हिंदुस्थानसमोर २६५ धावांचे आव्हान

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम

बांगलादेशने ५० षटकांत ७ बाद २६४ धावा करुन हिंदुस्थानपुढे २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्याची चुरस वाढली आहे. हिंदुस्थानने आजचा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत १८ जून रोजी हिंदुस्थानचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक: बांगलादेश – तमिम इक्बाल – ७० धावा, सौम्या सरकार – ० धावा, एस. रहमान – १९ धावा, एम. रहिम – ६१ धावा, शकिब हसन – १५ धावा, महमुदुल्ला – २१ धावा, एम. होसेन – १५ धावा, एम. मोर्तझा – नाबाद ३० धावा, टी. अहमद – नाबाद ११ धावा. । हिंदुस्थान – भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह आणि केदार जाधव – प्रत्येकी २ बळी, रविंद्र जडेजा – १ बळी.