जाडेजा, हनुमा यांची अर्धशतके,इंग्लंडला पहिल्या डावात 154 धावांची आघाडी

9


सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडच्या 332 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानला 95 षटकांत 292 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे यजमानांनी पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिल्या डावात 40 धावांची आघाडी घेण्यात यश मिळविले. हिंदुस्थानकडून हनुमा विहारीने पदार्पणाच्या कसोटीतच अर्धशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जाडेजाने नाबाद 86 धावांची खेळी करून हिंदुस्थानला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचविले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात 43.2 षटकांत 2 बाद 114 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑलिस्टर कुक 27, तर कर्णधार जो रुट 29 धावांवर खेळत होता. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर 154 धावांची आघाडी घेतली होती.

हिंदुस्थानने दुसऱ्या दिवसाच्या 6 बाद 174 धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. 25 धावांवर नाबाद परतलेल्या हनुमा विहारीने 124 चेंडूंच्या संयमी खेळीत 56 धावा करून पदार्पण सत्कारणी लावले. 8 धावांवर नाबाद परतलेल्या रवींद्र जाडेजाने हनुमासह तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून नाबाद 86 धावांची खेळी केली. हनुमा-जाडेजा जोडीने सातव्या गडय़ासाठी 77 धावांची भागीदारी केली. जाडेजाने 156 चेंडूंना सामोरे जाताना 11 चौकारांसह एक षटकार ठोकला. इंग्लंडकडून जेम्स ऍण्डरसन, बेन स्टोक्स व मोईन अली यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

हनुमा बसला द्रविड, गांगुलीच्या पंक्तीत

इंग्लंडकिरुद्धच्या पाचक्या कसोटीत हनुमा किहारीने ‘टीम इंडिया’त पदार्पण केले आणि पदार्पणातच अर्धशतक झळकाकले. शून्याकर असताना त्याला पंचांनी बाद ठरकले होते, पण डीआरएसमध्ये त्याला जीकदान मिळाले. या संधीचे सोने करत त्याने अर्धशतकी खेळी साकारली. इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा हनुमा चौथा फलंदाज ठरला. हनुमाच्या आधी तीन हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकाकले होते. त्यात पहिले रुसी मोदी यांचे नाक आहे. त्यांनी 1946 साली पहिल्याच कसोटीत नाबाद 57 धाका केल्या होत्या. त्यानंतर 1996 साली माजी कर्णधार सौरक गांगुलीने 131, तर राहुल द्रकिडने पदार्पणाच्या कसोटीत 95 धाकांची खेळी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या