कोहलीचा २००वा एकदिवसीय सामना, जाणून घ्या खास आकडेवारी

35
virat-kohli-in-action

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना कर्णधार विराट कोहलीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. हिंदुस्थानचा कर्णधार आणि आक्रमक खेळाडू विराट कोहली उद्या आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील २००वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जाणून घ्या विराट कोहलीच्या काही खास आकडेवारीबाबत…

> कोहलीने आपला पहिला एकदिवसीया सामना श्रीलंकेविरुद्ध १८ ऑगस्ट, २००८ ला खेळला होता.

> विराट कोहली आतापर्यंत १९९ एकदिवसीय सामने खेळला आहे.

> १९९ एकदिवसीय सामन्यात कोहलीने ५५.१४च्या सरासरीने ८ हजार ७६७ धावा केल्या आहेत.

> कोहलीचा एकदिवसीय सामन्यातील स्ट्राईक रेट ९१.४८ एवढा जबरदस्त आहे.

> विराटने आपले पहिले शतक श्रीलंकेविरुद्ध २००९मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर ठोकले होते. या सामन्यात कोहलीने १०७ धावा करत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.

> कोहलीने आतापर्यंत ३० एकदिवसीय शतक झळकावले असून, शतकांच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉण्टिंगसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

> तुलनात्मक पाहिले तर कोहलीने १९९ सामन्यात ३० शतकं, डिव्हिलिअर्सने २४ शतकं, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने १८ शतकं ठोकली आहेत.

> कोहलीच्या ३० शतकांपैकी २६ शतकांवेळी हिंदुस्थानचा विजय झाला आहे, तर फक्त ४ शतकांवेळी पराभव स्वीकारावा लागला आहे.

> कोहलीने आतापर्यंत ४५ अर्धशतकं ठोकली आहेत.

> कोहलीचा एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम स्कोर १८३ आहे. पाकिस्तानविरुद्द १८ मार्च, २०१२ला ढाकामध्ये झालेल्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती.

> एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ८१८ चौकार आणि ९५ षटकारांची आतषबाजी केली आहे.

> गोलंदाजीमध्ये कोहलीने ४ बळीही घेतले आहेत.

> आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या