शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकणारा दिनेश कार्तिक ट्रोल, स्वत:ला धोनी समजतो का?

145
dinesh-karthik

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्यावर्षी बांगलादेश विरुद्ध निदहास चषकात सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून देणारा दिनेश कार्तिकला या वर्षभरात क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांच्या टिकेचं लक्ष्यं बनला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेच्या शेटच्या आणि निर्णायक ठरणाऱ्या सामन्यानंतर दिनेश कार्तिकला ट्रोलरनी व्हिलन ठरवण्यास सुरुवात केली आहे. दिनेश कार्तिक स्वत:ला धोनी समजतो काय? असा सवाल सगळ्यांनी उपस्थित केला आहे.

शेटवच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एक धाव न काढणारा दिनेश कार्तिकच यासाठी जबाबदार धरला जात आहे. शेवटच्या रंगतदार सामन्यात टीम इंडियाला जिंकण्यासाठी अंतिम षटकात 16 धावा आवश्यक होत्या. या 16 धावा पूर्ण झाल्या असत्या तर इतिहास रचला गेला असता. हिंदुस्थान केवळ तो सामनाच नाही तर न्यूझीलंडच्या धरतीवर यजमान देशाच्या विरोधात टी-20 मालिका जिंकणारा पहिला संघ ठरला असता.

शेवटच्या सामन्यातील तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने 1 धाव घेतली असती तर टीम इंडियाला 3 चेंडूत 13 धावा कराव्या लागल्या असत्या. क्रुणाल पंड्या चांगली फलंदाजी करत असल्याने त्याने विजय खेचून आणला असता. किंवा एक धाव तरी कमी झाली असती, पण तो चेंडू निर्धाव ठरला आणि फलंदाजांवर दबाव वाढला. चौथ्या चेंडूवर धाव घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पंड्याने एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर 12 धावा आवश्यक होत्या. त्यानंतर एक चेंडू वाईड पडला. मग शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार खेचला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. 4 धावांनी संघ पराभूत झाला. दिनेश कार्तिकने तो एक चेंडू निर्धाव सोडला नसता तर चित्र बदलेलं असतं असं क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळेच दिनेश कार्तिक स्वत: धोनी समजतो का असं म्हणत त्याला ट्रोल केलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या