टी-२० जिंकून टीम इंडियाचा त्रिवार विजय!

सामना ऑनलाईन । कोलंबो

कसोटी आणि वन-डे मालिकेत श्रीलंकेला व्हाईट वॉश देणाऱया टीम इंडियाने एकमेव टी-२० लढतीतही यजमानांवर ७ विकेट आणि ४ चेंडू राखून विजय मिळवत श्रीलंका दौऱयात त्रिवार यश मिळवले. प्रथम फलंदाजीस पाचारण करण्यात आलेल्या श्रीलंकन संघाने २० षटकांत ७ बाद १७० अशी मजल मारत हिंदुस्थानपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान ठेवले होते; पण कर्णधार विराट कोहली (५४ चेंडूंत ८२) व मनीष पांडे (३६ चेंडूंत नाबाद ५१) यांनी संघाला चुरशीचा विजय मिळवून देत टी-२०ही जिंकून दिली. हिंदुस्थानने १९.२ षटकांत ३ बाद १७४ अशी मजल मारली.