शत्रूंच्या अण्वस्त्रांचा खात्मा करणारे “सीक्रेट शिप” येतेय

76

सामना ऑनलाईन | विझाग

हिंदुस्थानी तंत्रज्ञांनी आता नव्या पूर्ण देशी बनावटीच्या अण्वस्त्रशोधक आणि नाशक लढाऊ जहाजाची निर्मिती केली आहे. “सीक्रेट शिप” या नावाने ओळखले जाणारे हे जहाज लवकरच हिंदुस्थानी नौदलात दाखल होणार आहे. या जहाजात शत्रूंच्या अण्वस्त्रांचा शोध घेऊन वेळीप्रसंगी त्यांचा खात्मा करण्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत या आधुनिक लढाऊ जहाजाची बांधणी हिंदुस्थान शिपयार्डने केली आहे. पूर्ण देशी बनावटीची ही लढाऊ नौका देशाच्या न्यूक्लीअर मिसाईल शील्डचा ( अण्वस्त्रे रोधक सुरक्षाकवच ) कणा ठरणार आहे.

हिंदुस्थान शिपयार्डने बांधलेले व्ही सी १११८४ हे लढाऊ जहाज त्यावर बसवलेल्या शक्तिशाली रडारच्या मदतीने शत्रू राष्ट्रांच्या अण्वस्त्रांचा शोध घेईल आणि त्यांचा धोका जाणवल्यास ती नष्ट करण्याची कृती करू शकणार आहे. जहाज १४ मेगावॅट वीज उत्पादन करू शकेल आणि ती जहाजावर बसवलेल्या शक्तिशाली रडार व सेंसरना पुरवेल. हे जहाज देशाच्या अण्वस्त्र आणि मिसाईल चाचणीच्या वेळेस आपल्या अण्वस्त्रांनाही ट्रॅक करू शकणार आहे. नौदलात येत्या डिसेम्बरमध्ये सामील होणाऱ्या या सीक्रेट शिपच्या बांधणीसाठी ७२५ कोटी रुपये खर्च आला आहे. त्याचे वजन १५ टन असल्याची माहिती हिंदुस्थान शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक एल व्ही सरतबाबू यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या