Asian Games 2018 – हिंदुस्थानच्या पोरी सुसाट, 4×400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक

महिलांच्या 4 x400 मीटर धावण्याच्या रिले शर्यत हिंदुस्थानने 3.28.72 अशी वेळ देत पूर्ण करत सुवर्ण पदक जिंकले. या संघात हिमा दाससह पूवम्मा राजू, सरिताबेन गायकवाड, विस्मया वेलुया या खेळाडूंचा समावेश होता.

सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला 13 वे सुवर्णपदक मिळाले आहे. गुरुवारी महिलांच्या 4 बाय 400 रिले शर्यतीत हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळाले. आजच्या दिवशीचे हे दुसरे सुवर्णपदक असून याआधी जिन्सन जॉन्सन याने 1500 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

गुरुवारी सायंकाळी झालेल्या महिलांच्या 4 बाय 400 रिले स्पर्धेत हिंदुस्थानने विजय मिळवला. महिला संघाने हे अंतर 3 मिनिट 28.72 सेकंदात पूर्ण केले. हिंदुस्थानच्या 4 बाय 400 रिले संघात हिमा दास, पोवम्मा राजू, सरिताबेन गायकवाड आणि विस्माय कोरोथ हे सहभागी झाले होते.

दुसरीकडे पुरुषांच्या 4 बाय 400 रिले स्पर्धेत हिंदुस्थानला रौप्यपदक मिळाले आहे. पुरूष संघाने 3 मिनिट 1.85 सेकंदाचा वेळ घेत रौप्य पदक जिंकले.