हिंदुस्थानातील गेली साडेचार वर्षे असहिष्णुतेची!

39

सामना ऑनलाईन । दुबई

संयुक्त अरब अमिरातीमध्ये यंदा ‘सहिष्णुता वर्ष’ साजरे होत आहे. पण आमच्या हिंदुस्थानात गेली साडेचार वर्षे असहिष्णुता असून त्याचे मला तीव्र दुःख होत आहे अशी खंत व्यक्त करून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे मोदी सरकारवर निशाणा साधला. ते हिंदुस्थानी जनसमुदायाला संबोधित करत होते.

सहिष्णुता असेल तर बंधुत्वाच्या भावनेने आणि सर्व धर्मांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करता येते असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, आजघडीला अमेरिका, युरोपमध्ये हिंसेचे वातावरण आहे, पण आपणा हिंदुस्थानींच्या ‘डीएनए’मध्ये अहिंसा आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसेचे तत्त्व सर्व धर्मांतून स्वीकारले होते.

हिंदुस्थान सध्या तोंड देत असलेली सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची आहे. आम्ही त्या समस्येवर मात तर करू शकतोच पण त्याचबरोबर चीनलाही आव्हान देऊ शकतो हे जगाला आपणास दाखवून द्यायचे आहे असे ते म्हणाले.

संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱयातील राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱयातील कार्यक्रमांप्रमाणे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.

n लोकसभेची निवडणूक काँग्रेसने जिंकण्याचाच अवकाश, आंध्र प्रदेशला ताबडतोब विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल असे एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या