#ICCWorldCup कपिल देव यांचा 83 मधील ‘तो’ विक्रम मोडण्याची शक्यता यंदाही मावळली

114

सामना ऑनलाईन । मुंबई

1983 मध्ये आयसीसीच्या तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेवर हिंदुस्थानने मोहोर उमटवली आणि देशात एकच जल्लोष झाला. अंतिम सामन्यात हिंदुस्थानने बलाढ्य वेस्ट इंडीजचा 43 धावांनी पराभव केला तेव्हा मैदानावर चाहत्यांनी धाव घेत खेळाडूंना अक्षरश: उचलून घेतले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने ही कामगिरी केली होती. याच वर्ल्डकपमध्ये कपिल देव यांनी एक असा विक्रम नोंदवला जो आजही अबाधित आहे आणि यंदाच्या 2019 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये मोडण्याची शक्यताही जवळजवळ मावळली आहे.

Photo : 1975 ते 2015, आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेते
#ICCWorldCup वर्ल्डकपमध्ये फक्त 36 धावांत ‘या’ संघाचा खुर्दा उडाला

हिंदुस्थानने 1983 मध्ये वर्ल्डकपवर मोहोर उमटवली तेव्हा कपिल देव यांचे वय होते अवघे 24 वर्षांचे. सर्वात कमी वयात देशाला वर्ल्डकप जिंकून देण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. 83 नंतर आतापर्यंत 9 विश्वचषक झाले परंतु एकाही विजेत्या संघाच्या कर्णधाराचे वय एवढे कमी नव्हते. 36 वर्षानंतरही हा विक्रम अबाधित आहे आणि 40 वर्षापर्यंतही अबाधित राहण्याची शक्यता आहे. कारण यंदा सहभागी झालेल्या 10 संघांपैकी एकाही संघाच्या कर्णधाराचे वय कपिल देव यांच्या आसपास नाही. यंदा सर्वात कमी वय वेस्ट इंडीजच्या कर्णधाराचे आहे. जेसन होल्डर 27 वर्षाचा आहे त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची शक्यता नाही. अपवाद फक्त एखाद्या संघाचा कर्णधार जखमी झाला आणि 24 वर्षापर्यंतच्या खेळाडूला त्या संघाचे कर्णधारपद मिळाले व त्या संघाने चषक जिंकला तर हा विक्रम मोडू शकतो.

#ICCWorldCup इतिहासाची सफर – कसा होता पहिला वर्ल्डकप?
#ICCWorldCup इतिहासाची सफर – विंडीज सलग दुसऱ्यांचा विश्वविजेता
आपली प्रतिक्रिया द्या