आशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक


सामना ऑनलाईन । दोहा

हिंदुस्थानच्या संघाला आशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. पाकिस्तानकडून हिंदुस्थानला 3-2 अशा फरकाने हार सहन करावी लागली. त्यामुळे हिंदुस्थानला सुवर्णपदकापासून दूरच राहावे लागले.

पाकिस्तानच्या बाबर मसिहकडून हिंदुस्थानचा अनुभवी खेळाडू पंकज अडवाणी पराभूत झाला. त्यानंतर मलकीत सिंगने पाकिस्तानच्या मुहम्मद असिफला हरवत हिंदुस्थानसाठी बरोबरी साधली. दुहेरीत पाकिस्तानने हिंदुस्थानला हरवत पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवली, पण स्टार खेळाडू पंकज अडवाणीने मुहम्मद असिफला नमवत 2-2 अशी बरोबरी साधली. मात्र अखेरच्या लढतीत बाबर मसीहकडून मलकीत सिंगला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हिंदुस्थानचे सुवर्णपदक हुकले.

summary- india won in asian team snooker championship