फ्रान्स आणि इंग्लंडपेक्षा हिंदुस्थान ताकदवान

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थान जगातील ६ वी मोठी अर्थव्यवस्था असल्याने नुकतेच समोर आले आहे, आता सैन्याच्या बाबतीतही हिंदुस्थानने फ्रान्स आणि इंग्लंडला मागे टाकले आहे. ग्लोबर फायर पॉवर या संस्थेच्या अहवलानुसार सैन्य आणि ताकदीच्या बाबतीत हिंदुस्थानचा चौथा क्रमांक लागतो. पाकिस्तानकडून कितीही अणू हल्ल्याचा धमक्या आला तरी परिस्थिती वेगळी आहे. सैन्य आणि ताकदीच्या बाबतीत पाकिस्तानचा क्रमांक पहिल्या १० मध्येही लागत नाही.

फ्रान्स आणि इंग्लंडच्या पुढे हिंदुस्थान
ग्लोबल फायर पॉवर या संस्थेने २०१७ साली १३३ देशांचा सैन्याच्या आणि ताकदीचा अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार अमेरिका, रशिया आणि चीननंतर हिंदुस्थानचा क्रमांक लागतो. तर हिंदुस्थाननंतर फ्रान्स आणि इंग्लंडचा क्रमांक लागतो. या अभ्यासात अण्वस्त्रांचा समावेश केलेला नसून संरक्षण अर्थसंकल्प, सैन्याला मिळणारी साधने, उद्योग आणि भौगोलिक आधारावर मिळणार्‍या सुविधा आणि उपलब्ध मनुषबळ या निकषांवर अभ्यास केला आहे.

हिंदुस्थानच्या समोर पाकिस्तान काहीच नाही
संस्थेच्या अहवालानुसार हिंदुस्थानकडे २ हजारहून अधिक युद्धनौका आहेत. सक्रीय सैंन्याची संख्या १३ लाखाहून अधिक असून राखीव सैनिकांची संख्या २८ लाख इतकी आहे. तर रणगाड्यांची संख्या ४४०० इतकी आहे. सैन्य आणि ताकदीत पाकिस्तानचा १३ वा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षात पाकिस्तानने आपल्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण अर्थसंकल्प ७ हजार कोटींचा आहे. सक्रीय सैनिकांची संख्या ६ लाख ३७ हजार असून राखीव सैनिकांची संख्या फक्त ३ लाख आहे. हेलिकॉप्टर, युध्दनौका आणि इतर गाड्यांची संख्या ही एक हजार इतकी आहे. पाकिस्तानकडे ३ हजार रणगाडे आहेत. तर समुद्री नौकांची संख्या २०० इतकी आहे.