हिंदुस्थानी सैन्याकडून पाच पाकड्यांचा खात्मा, 12 बंकर नष्ट

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदुस्थानने जशास तसे उत्तर दिले आहे. हिंदुस्थानी सैन्याने गेल्या तीन ते चार दिवसांत पाकिस्तानचे पाच सैनिक मारले आहेत. तसेच पाकिस्तानचे १२ बंकर नष्ट करण्यातही हिंदुस्थानी सैन्याला यश आले आहे. हिंदुस्थानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टर आणि राजौरी भागात उत्तरादाखल गोळीबार केला.

लष्कर दिनानिमित्त सैनिकांशी संवाद साधताना लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले होते की “आपल्याला शत्रूंना सडेतोड उत्तर द्यायचे आहे. त्यांना मी इशारा देतो की घुसखोरीचा प्रयत्न केला तर त्यालाचा चांगलेच प्रत्युत्तर होईल.”

तर दुसरीकडे जम्मू कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात मंगळवारी आंतरराष्ट्रीय सीमेजवाळ पाकिस्तानी रेंजर्सच्या स्नायपरने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी जिल्हातील नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत शस्त्रसंधींचे उल्लंघन केले होते त्यावर हिंदुस्थानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले होते.