मदालसा

263
बॉलिवू़डची मस्तानी दीपिका पादुकोणला इडली खायला खूप आवडते.

हिंदुस्थानी सौंदर्य जागतिक व्यासपीठावर आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारं… एका ब्रिटिश मासिकाने जगातील दहा मादक महिला निवडल्या… त्यापैकी नऊ आपल्या हिंदुस्थानी मदालसा आहेत…

दीपिका पडुकोण

आता हिच्याविषयी काय बोलणार… सिध्दार्थ मल्ल्या ते रणवीर सिंह अशा मित्रांबरोबर तिची असलेली मैत्री जगजाहीर आहे. रणबीर कपूरबरोबर प्रेमात असताना तिने मानेवर काढलेला टॅटू हा त्यावेळी चर्चेचा विषय होता. सर्वात सेक्सीएट वूमन असा किताब मिळालेल्या दिपिका हिची फिगर आणि ती फिगर मेन्टेन करण्यासाठी ती करीत असलेली मेहनत हे जेव्हा तिच्या आऊटफिटवरून समजते…

इव्हनिंग गाऊन असो, डेनिम असो वा मग साडी असो दिपिका तिच्या प्रत्येक अटायरमध्ये मादकच दिसते. ‘ब्युटी विथ ब्रेन’ असे तिचे हटके कॉम्बिनेशन आहे असेच म्हणावे लागेल. शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’पासून सुरुवात करणाऱया दीपिकाचा गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमधला ग्राफ सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणारा आहे. वेगवेगळया प्रकारच्या भूमिका आणि त्यासाठी तिची मेहनत हे सर्वश्रुत आहे. ब्रिटिश मॅगझिन ‘इस्टर्न आय’ने तिची निवड आशियातील सेक्सी महिला म्हणून केली आहे.म्हणून निवड केली आहे.

प्रियांका चोप्रा

बॉलीवूड ते हॉलीवूड आणि आता परत बॉलीवूड असा प्रवास करणाऱया प्रियांका चोप्राचा करीअर ग्राफसुध्दा नेहमी चढा राहिला आहे. २०००मध्ये विश्वसुंदरी झाल्यावर प्रियांकाने काही वर्षातच बॉलीवूडमध्ये पर्दापण केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिल धडकने दो’ या सिनेमाने तिला आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवून दिले.
भूमिकेसाठी अंगप्रदर्शन करायला तिने कधीच नकार दिला नाही… झीरो फिगर किंवा परफेक्ट फिगर असेच प्रियांकाकडे पाहून म्हणावेसे वाटते… आज नवीन आलेल्या हिरोईनची संख्या पाहता प्रियांकाने अजूनही आपले अढळ स्थान टिकवून ठेवले आहे. यापूर्वी याच मॅगझिनने प्रियांकालाही सेक्सी आशियाई महिला हा किताब दिला होता. आता तर केंद्र शासनानेही पदमश्री देऊन तिच्या कामाचे कौतुक केले आहे.

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही एक अशी अभिनेत्री आहे की जिच्या सामान्य ज्ञानाबद्दल नेहमीच टर उडविली गेली. व्हॉटसअपवरही आलियाचे अनेक जोक्स फॉरवर्ड होत असतात. असे असले तरी आलियाने आपल्या कामाने सगळयांची तोंड बंद केली आहेत. ‘उडता पंजाब’ असो, ‘कपूर ऍण्ड सन्स’ असो वा ‘डिअर जिंदगी’ 2016मध्ये तीन सिनेमे हिट दिल्याने आलिया भट्ट आता निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे. सिध्दार्थ मल्होत्राबरोबरील रिलेशनबाबत अत्यंत हळवी असलेल्या आलियाने मेहनतीने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्के केले आहे. खरे तर आलियाकडे पाहून ती अभिनेत्री वाटत नाही अशी तिच्यावर टिका झाली, पण तिच्याकडे पाहिल्यावर तिची बॉडी आणि फिगर नक्कीच आर्कर्षित करणारी आहे हे मानावंच लागेल. बोल्डनेस काय असतो हे आलियाने आपल्या सिनेमातून दाखवून दिले आहे.

सोनम कपूर

रणबीर कपूरसोबत ‘सांवरिया’ या सिनेमातून पर्दापण करणाऱया सोनमने आतापर्यंत अनेक सिनेमे केले. सोनम कपूर आणि दिपिका पडुकोण एकाचवेळी बॉलीवूडमध्ये आल्या. अनिल कपूर यांची मुलगी असूनही सोनम बॉलीवूडमध्ये स्ट्रगल करीत राहिली. २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’मध्ये नीरजा भनोट या भूमिकेने सोनम चांगली अभिनेत्री असल्याचे शिक्कामोर्तब केले. उत्कृष्ट फॅशन सेन्समुळे सोनमने बॉलीवूड ते हॉलीवूड गाजवले. हॉलीवूडमध्ये रेड कार्पेट गाजवणाऱया सोनमची उंची, फॅशन सेन्स आणि ट्रडिशनल आणि वेस्टर्न मॅच यामुळे सोनम फॅशन जगतात प्रसिध्द आहे.

कतरिना कैफ

सलमान खानबरोबर असलेली विशिष्ट मैत्री, मग रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशन आणि आता आदित्य रॉय कपूरसोबतची वाढलेली मैत्री अशा नेहमीच चुकीच्याच कारणांमुळे कतरिना कैफ प्रसिद्धीत राहिली. फिटनेसबाबत जागरुक असणाऱया कतरिनाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले असून आता ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा नव्या वर्षात प्रदर्शित होईल.
कतरिना कैफ ही खरे तर ब्रिटीश अभिनेत्री पण तिच्या सौदर्यांने अनेकजण दिवाने झाले आहेत. हिंदी चांगले फारसे बोलू न शकणारी कतरिना आपल्या मादक लुकमुळे, सेक्सी अंदाज आणि उत्कृष्ट नृत्यशैलीमुळे प्रसिध्द आहे.

आपली प्रतिक्रिया द्या