श्रीलंका दौऱ्याआधी हिंदुस्थानला धक्का, मुरली विजय आऊट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर मुरली विजय दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्याला मुकणार आहे. मुरली विजयच्या जागी डावखूरा फलंदाज शिखर धवनला श्रीलंका दौऱ्यात जाण्याची संधी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयला) सोमवारी जारी केलेल्या वक्तव्यामध्ये, मुरली विजयला दुखापत झाल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी त्याच्या जागेवर शइखर धवनची निवड करण्यात येत असल्याचे म्हटले. मुरली विजयला हाताला दुखापत झाल्याने बीसीसीआयच्या वैद्यकिय पथकाने विजयला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

हिंदुस्थानच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात २६ जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात २६ जुलै ते ६ सप्टेंबरदरम्यान ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला जाणार आहे.