श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात तीन हिंदुस्थानींचा मृत्यू

1

सामना ऑनलाईन । कोलंबो

रविवारी श्रीलंका आठ साखळी बॉम्बस्फाटांनी हादरले. या स्फोटात 207 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन हिंदुस्थानींचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. लोकाशिनी, नारायण चंद्रशेखर, रमेश अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघा हिंदुस्थानींची नावे आहेत. त्यातील लोकाशिनी या त्यांच्या नातेवाईकांना भेटायला श्रीलंकेत गेल्या होत्या.

श्रीलंकेत रविवारी सकाळी तीन चर्च, तीन पंचतारांकित हॉटेल्स आणि दोन गेस्टहाऊसमध्ये बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 207 जणांचा मृत्यू झाला असून 450 जण जखमी झाले आहेत.