वर्ल्ड कपसाठी वेगवान गोलंदाजांनी आयपीएल खेळू नये, विराटची नवी मागणी

1
virat-kohli-ravi-shastri-test

सामना ऑनलाईन,मुंबई

पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ३० मे ते १४ जुलै दरम्यान ही स्पर्धा आयोजिक केली जाणार असून या स्पर्धेच्या १० दिवस आधी आयपीएल संपणार आहे. विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित असेल तर त्यांना आयपीएलमध्ये खेळायला देऊ नका, त्याऐवजी त्यांना आराम करू द्या अशी शिफारस हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीने सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या संचालकांच्या समितीसमोर केली आहे.जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्या नावांचा उल्लेख करत कोहलीने ही मागणी केली आहे.

विराटच्या या मागणीनंतर हिंदुस्थानी संघातर्फे दोन पर्याय बीसीसीआयपुढे ठेवण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे आयपीएल मध्ये न खेळल्याबद्दल या वेगवान गोलंदाजांना भरपाई द्यावी जेणेकरून हे गोलंदाज आयपीएलच्या मोहात न पडता आराम करतील किंवा या खेळाडूंना फक्त आयपीएलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातच खेळण्याची परवानगी दिली जावी जेणेकरुन त्यांना आराम करता येईल. या सूचनांवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये मात्र या मागणीबाबत आयपीएल प्रशासनाशी सल्ला न्यायालयाने नेमलेल्या संचालकांच्या समितीने सल्ला मसलत केलेली आहे. जर हा निर्णय अंमलात आणण्यात आला तर त्याचा सगळ्यात मोठा फटका मुंबई इंडियन्स या संघाला बसणार आहे, कारण या संघातील बुमराह आणि हार्दिक पांड्या या दोन क्रिकेटपटूंना विश्रांती देण्यात येईल.