रुपयाची घसरगुंडी सुरूच!

13
dollar-vs-rupee

सामना ऑनलाईन । मुंबई

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी आणखी खाली घसरून प्रतिडॉलर 70.82 वर पोहोचला. याआधी बुधवारी रुपयात 42 पैशांची घसरण होऊन तो 70.52 प्रतिडॉलर इतक्या खाली आला होता.

महिनाअखेर डॉलरची मागणी वाढल्याने आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत कमालीची घट झाल्याने रुपयात घसरण झाली. बँका आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी झाल्याने रुपयावर दबाव निर्माण झाला. दरम्यान, परदेशी बाजारात अन्य चलनाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याचा परिणामही रुपया घसरण्यावर झाल्याचे उद्योजकांनी म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल रिफायनरी कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात…

मजबूत रुपया म्हणजेच चांगली स्थिती असे मानणे हा लोकांचा निव्वळ भ्रम असल्याचे ‘नीती’ आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे, तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे कुठलीही चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

Summary: Indian Rupee now at 70.82 versus the US dollar

आपली प्रतिक्रिया द्या