अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थी असुरक्षित

फाईल फोटो

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

वंशभेदावरून अमेरिकेत हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले होत असल्याने तेथे शिक्षण घेणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेचे भावना निर्माण झाली आहे, अशी माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) असे या संस्थेचे नाव आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे. यामुळे अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर मध्यपूर्व देशांतील विद्यार्थ्यांबरोबरच हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी मध्यपूर्व देशातील विद्यार्थी येणार नाहीत असे ३१ टक्के शैक्षणिक संस्थाना वाटत आहे तर हिंदुस्थानी विद्यार्थीही अमेरिकेत येण्यास तयार नाहीत असे २० टक्के शैक्षणिक संस्थाना वाटत आहे. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना व्हिसा देताना अनेक अडचणी येत असल्याचे ४६ टक्के संस्थांनी सांगितले आहे. ट्रम्प सरकारच्या नव्या नियमांमुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल ८० टक्के संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.