ही आहे हिंदुस्थानची ‘विष कन्या’, २४ तास असते कोब्र्यांसोबत

सामना ऑनलाईन। हमीरपुर

कोब्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो काळ्याकुट्ट रंगाचा विषारी फुत्कार सोडणारा भलामोठा नाग. चित्रपटात तर विष कन्या माणसांना ठार मारताना आपण बघितलेलं आहे. पण हिंदु्स्थानमधील बुंदेलखंडमध्ये हमीरपुरपासून काही अंतरावर राहणाऱ्या काजोल या विषकन्येने आपल्या कोब्रा प्रेमाने सगळ्यांनाच जिंकले आहे.

८ वर्षांची ही चिमुकली २४ तास एक दोन नव्हे तर चक्क सहा विषारी कोब्रांबरोबर राहते. ते तिला अनेकवेळा दंशही करतात. पण काजोलला काही होत नाही. यामुळे तिला विषकन्या म्हणून संबोधलं जातं आहे.

काजोल व कोब्रा यांची मैत्री गावातच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातही हीट झाली आहे. कोब्रांबरोबर जास्त वेळ घालवण्यात यावा म्हणून काजोलने तिसरीत असतानाच शाळा सोडली होती. ती त्यांच्याबरोबरच नाश्ता आणि जेवण करते, फिरायलाही जाते. कोब्राच्या विषाच्या एका थेंबात ४० जणांचा जीव घेण्याची क्षमता असते. अशा विषारी कोब्रांच्या सान्निध्यात काजोल राहत असल्याने तिच्या घरच्यांना मात्र तिची चिंता सतावत असते.

नुकताच काजोलचा कोब्रांबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता पर्यंत हा व्हिडीओ १३ दशलक्ष लोकांनी बघितला असून ७ हजाराहून अधिकवेळा शेअर करण्यात आला आहे.

summary…indian vish kanya at bundelkhand