नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान मिळणे हे हिंदुस्थानीचे अहोभाग्यच, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा

87

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीचे पूल बांधले आहेत. मोदी हे एका महान व्यक्ती व नेते आहेत. त्यांच्यासारखे पंतप्रधान हिंदुस्थानला मिळणे हे तेथील जनतेचे भाग्यच समजावे लागेल, अशी स्तुती ट्रम्प यांनी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरू मोदींची स्तुती केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींशी नुकतीच फोनवर चर्चा झाली. त्यावेळी त्यांच्या मोठ्या राजकीय यशासाठी मी त्यांचे अभिनंदन केले. एका महान नेते व व्यक्ती आहेत. त्यांच्यासारखे पंतप्रधान हिंदुस्थानला मिळणे हे तेथील जनतेचे भाग्यच’, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

त्याआधी त्यांनी पत्रकारांशी बोलताना देखील मोदींना शुभेच्छा दिल्या ‘हिंदुस्थानचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. मोदी हे माझे चांगले मित्र देखील आहेत. मी अमेरिका व आपल्या सर्वांतर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या’, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या