Asian Games 2018 : हेप्टाथलॉनमध्ये स्वप्नाचा विक्रम, हिंदुस्थानला 11 वे सुवर्ण

सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्तामध्ये सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 11 व्या दिवशी हिंदुस्थानने दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. अरपिंदर सिंह पाठोपाठ हेप्टाथलॉनमध्ये स्वप्ना बर्मन हिने ऐतिहासिक कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. हिंदुस्थानच्या खात्यात आता 11 सुवर्णपदक जमा झाले आहेत.

याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11 व्या दिवशी पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये अरपिंदर सिंहने सुवर्णपदक जिंकले. दयूती चंदने महिलांच्या 200 मीटर शर्यतीमध्ये रौप्यपदक जिंकले. तसेच मणिका बत्रा आणि शरथ कमल यांनी टेबल टेनिसच्या मिक्स प्रकारात कांस्य पदक जिंकले.