इंद्राणी मुखर्जी जे.जे.त

सामना ऑनलाईन । मुंबई

शिना बोरा हत्याकांडातील अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी  इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती अचानक शुक्रवारी रात्री ढासळली. इंद्राणीला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. अशी माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाने दिली. २४ एप्रिल २०१२ रोजी शिना बोराची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला पोलिसांनी याप्रकरणी २०१५ साली अटक केली. सध्या इंंद्राणी भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत असून तिची प्रकृती शुक्रवारी अचानक ढासळली. तिला जे.जे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचारानंतर आता तिची प्रकृती स्थिर असून औषधांना ती प्रतिसाद देत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर नंदनकर यांनी सांगितले. तिच्या रक्त चाचण्या व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून लवकरच त्याचा अहवाल मिळेल. त्यामुळे इंद्राणीला नेमके काय झाले हे आताच काही सांगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.