इंदू मिल येथे स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार

1

सामना ऑनलाईन । मुंबई

इंदू मिल येथील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात कधी साकारणार असा सवाल सर्वच स्तरांतून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिलमधील स्मारकाला भेट देऊन २०१९ पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरूपात दिसेल आणि १४ एप्रिल २०२०पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल अशी घोषणा केली. दरम्यान उद्या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील स्मारक स्थळाला भेट दिली. तेथील प्रतिकृतीची पाहणीही त्यांनी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण त्यांना यावेळी करण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे या भव्य स्मारकाचे वांद्रे-वरळी सी लिंकवरूनदेखील दर्शन घेता येईल. स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. स्मारकाचे काम कालबद्ध पद्धतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.