इंदुमती पाटणकर

1

स्कातंत्र्यसेनानी इंदुमती पाटणकर  यांनी सर्वसामान्य शेतमजूर, किधका, परित्यक्ता महिलांना हक्क मिळकून देण्यासाठी  संघर्ष केला. शेतमजूर महिलांसाठी त्यांनी १९९५ मध्ये मोठा लढा उभारला होता. तळागाळातील क मागास लोकांना शासकीय योजनांचे लाभ मिळकून देण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या मातोश्री होत. इंदुमती पाटणकर या मूळच्या इंदोली, (ता. कऱहाड) येथील. त्यांचे वडील दिनकरराव निकम देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यामुळे घरातूनच त्यांना क्रांतिकारक विचारांचा वारसा मिळाला. दहा – बारा वर्षांच्या असल्यापासून इंदूताई ‘व्होल्गा ते गंगा’सारखी पुस्तके वाचू लागल्या. त्यामुळे क्रांतीच्या विचारांनी त्यांना प्रेरित केले. लहान वयातच त्या कॉंग्रेसच्या सभेत भाग घेऊ लागल्या. कऱहाड येथील राष्ट्र सेवादलाच्या उपक्रमातही त्या सहभागी होऊ लागल्या. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात त्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्या. त्यांनी महिलांना संघटित केले. १९४२पासून त्या प्रतिसरकारच्या भूमिगत चळवळीत सहभागी झाल्या. स्कातंत्र्यसैनिक बाबूजी पाटणकर यांच्याशी त्या किकाहबद्ध झाल्या. माहेरीच त्यांना देशभक्तीचे धडे मिळाले. त्यामुळे त्यांनी स्कत:ला पतीसोबत स्कातंत्र्यसंग्रामात झोकून दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ‘पत्री सरकार’च्या त्या आधारस्तंभ होत्या. कै. लक्ष्मीबाई नायककडी यांच्यासोबत त्या भूमिगत कार्यकर्त्यांना भाजी-भाकरी पोहचकीत. क्रांतिकीर नागनाथअण्णा नायककडी, पांडू मास्तर, शेख चाचा यांच्यासोबत १९४७पर्यंत त्यांनी ब्रिटिशांच्या किरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. देशाला स्कातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील त्यांनी किकिध प्रकारची आंदोलने उभारली. स्वातंत्र्यलढ्यानंतर इंदूताई आणि बाबूजी हे दोघेही सोशॅलिस्ट पार्टीचा एक भाग बनले होते. १९४९मध्ये सैद्धांतिक व राजकीय मतभेदांमुळे ते अरुणा असफअली यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचा एक भाग बनले. नंतर १९५२मध्ये ते कम्युनिस्ट विचारांनी काम करू लागले. बाबूजी पाटणकर यांच्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यात सहभाग घेतला. त्यांचे सासर कासेगाव हे चळवळीचे एक केंद्रच बनले होते. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. कासेगाक एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत बाबूजी यांच्यासोबत त्यांचाही सहभाग होता. त्यांनी स्कतŠ शिक्षिका म्हणून अध्यापनही केले.