रमझानमध्ये महागाईने पाकिस्तानला रडवले

89

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पाकिस्तानातील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून रमझानच्या पवित्र महिन्यातच महागाईने कहर केला आहे. दुधाचे दर 190 रुपये लिटरवर पोहचले असून केळी 150 रुपये डझन झाली आहेत. एक डझन संत्री 360 रुपये तर लिंबू आणि सफरचंदाच्या किंमती 400 रुपये किलोवर पोहचल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरीकांवर रमझानमध्ये महागाईमुळे रडण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानी चलनात 20 टक्के घसरण झाली आहे. पाकिस्तानात एका डॉलरची किंमत 148 रुपयांपर्यंत गेली आहे. स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनाच्या किंमतींमध्ये सरकारने लक्षणीय काढ केली. त्यामुळेही अन्य वस्तुंचीदेखील दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मसाले व डाळी, तूप, तांदूळ, बेकरी उत्पादने, पीठ, खाद्यतेल, चहा, गहू यांच्या किंमती सुध्दा एक ते सक्का टक्के काढले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या