अमृतसर दुर्घटनेनंतर मृतांच्या, जखमींच्या अंगावरचे दागिने, मोबाईल चोरले

86

सामना ऑनलाईन । अमृतसर

अमृतसरमध्ये दसऱ्याच्या रात्री रावणदहनाच्या कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला तर ७० हून अनेकजण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडलेला असताना काही चोरट्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी मृतांचे मोबाईल, दागिने, पाकिटे चोरल्याचे समोर आले आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला वासू याच्या शरिरावरील सोन्याची चैन, बोटातील एक अंगठी, २० हजारांचा फोन आणि पाकिट सर्वच चोरट्यांनी लंपास केल्याचा आरोप वासूची आई ज्योती कुमारीने केला आहे. दीपक कुमार यांची तीन वर्षाची मुलगी नंदिनी हिचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर ते स्वत: जखमी झाले. मुलीच्या मृत्यूचे दु:ख करत असताना चोरट्यांनी त्यांचे पाकीट चोरले.

SUMMARY : Injured robbed of belongings, even the dead weren’t spared after Amritsar train accident

आपली प्रतिक्रिया द्या