देवबाग किनारी जखमी कासवाला जीवदान

1

सामना प्रतिनिधी, देवबाग

देवबाग समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यास आलेल्या ऑलिव्ह रिडले कासव कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. जखमी अवस्थेतील कासवाला स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक उपचार करून समुद्रात सोडून जीवदान दिले.

देवबाग किनाऱ्यावरील एका रिसॉर्टच्या जवळ कासव जखमी अवस्थेत सापडून आले. कुत्र्यांनी चावा घेत त्याला जखमी केल्याने त्याने एका झाडाकडे आसरा घेतला होता. त्याठिकाणी या कासवाची काही फुटकी अंडीही सापडून आली. त्यामुळे हे कासव किनाऱ्यावर अंडी घालण्यास आले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला. जखमी अवस्थेतील या कासवाला महेश तारी, सचिन हडकर व जयंत चोपडेकर व अन्य ग्रामस्थांनी समुद्रात सोडून जीवदान दिले.