कधीही न मरणारा जीव


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पृथ्वीतलावर कोणताही जीव जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ असतो. मात्र याच पृथ्वीवर एक असाही रहस्यमय जीव आहे ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. या प्राण्याचे नाव आहे जेलीफिश. चला तर जाणून घेऊया जेलीफिशबाबत काही खास गोष्टी…

१. जेलीफिश प्राणी मानव आणि डायनासोरच्या आधीपासून अस्तित्वात आहे. शाjelly6स्त्रज्ञांच्या मते जेलीफिश ६५० मिलियन वर्षांपासून पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे.jelly7२. जेलीफिश विविध आकारांमध्ये आढळतात. मात्र आत्तापर्यंत सापडलेली सर्वाधिक लांबीची जेलीफिश ७ फुट ६ इंचांची होती. याच्या मिशांची लांबी तब्बल १२० फुट एवढी प्रचंड लांब होती.

jelly4

३. जीवंत प्राण्याचे दोन भाग केले तर त्याचा मृत्यू होतो. मात्र जेलीफिशच्या बाबतीत उलटे आहे. जेलीफिशचे दोन भागात तुकडे केल्यास त्याचा मृत्यू होत नाही. दोन भागांमधून नव्याने एक जीव जन्माला येतो.

jelly3

४. जेलीफिश आणि काकडी यांच्यात एक समानता आहे. दोन्हींमध्ये तब्बल ९५ टक्के पाणी असते.

jelly5

५. प्रत्येक प्राण्याला मेंदू असतो, मात्र जेलीफिशच्या शरिरारामध्ये मेंदू नसतो. त्याऐवजी त्याच्या शरिरामध्ये नर्व्सचे जाळे असते. या नर्व्सच्या माध्यमातून जेलीफिश आजूबाजूचा बदल समजून घेते आणि प्रतिक्रिया देते.

jelly1

६. जेलीफिशच्या कळपामध्ये कधीही नर आणि मादी एकत्र नसतात. नर किंवा मादी यांचा कळप असतो. जेलीफिशच्या लिंगामध्ये शुक्राणु आणि अंडाणु हे दोन्ही बनतात.