जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे महत्त्व

सामना ऑनलाईन । मुंबई 

आज जागतिक योग दिवस. पाहूया योगाभ्यासाचे महत्त्व.

बध्दकोष्ठता 

शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, चक्रासन, भुजंगासन, अर्धत्स्येद्रासन, उष्टासन, हलासन, सर्वांगासन ही आसने करावीत. अथवा डावी नाकपुडी बंद करून उजकी मोकळी ठेवा. मूलबंध बांधून १०० पावले चाला. (शौचाची क्रियारोखण्यासाठी स्थिती) किंवा चार ग्लास पाणी पिऊन ताडासन, स्कंधासन, तिर्थक भुजंगासन, शंखासन आदी आसनांच्या दररोज एक एक आवृत्ती कराव्यात.

करपट ढेकर

सर्वांगासन, शीर्षासन, जानुशिरासन, भुजंगासन, चक्रासन, बध्दपद्मासन, उष्टासन, कर्णपिडासन उपयुक्त आहेत. तात्काळ फायदा होण्यासाठी मत्स्यासन, अर्धमत्स्यासन, उर्ध्वपद्मासन या आसनांचा अभ्यास करावा.

एसिडीटी

पित्ताच्या आजारावर शलभासन, नाडी शोधन, शीतळी शितवरी आणि प्लविनी प्राणायामाने फायदा होतो.

पोटाचे विकार

सर्वांगासन, बध्दपद्मासन, पश्चिमोत्तासन, सर्पासन, चक्रासन, मत्स्येद्रासन, उंटासन व पोटाचे व्यायाम लाभदायी ठरतात.

निद्रानाश

सर्वांगासन, सूर्यभेदी प्राणायाम, शीतली शीतवरी व योगनिद्रेचा फार फायदा होतो.

पाठदुखी

पाठीच्या कण्याचे व्यायाम, योगक्रिया, सुखासन, पद्मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, अर्धमत्स्येद्रासन, गोमुखासन, वंकासन, सुप्तवंकासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, एकपाद, शंक्खासन, नौकासन गुणकारी आहेत.

कातडीचे विकार

हे विकार दूर करण्यासाठी प्रार्थनेबरोबरच शंखपद्मासन व नाडीशोधन करावे.

मांडीचे आजार

सर्वांगासन, जानुशिरासन, पश्चिमोत्तासन, अर्धमच्छेंद्रासन, सूर्यभेदी प्राणायाम नेतीजलनेती करावी. करील आसन अधुनमधून करत राहिल्यास सर्दीपासून संरक्षण मिळते.

सुरकुत्या

कर्णी योगमुद्रा, शवासन, योगक्रियांचा उपयोग होतो.

तीव्र रक्तदाब

वंकासन, पवनमुक्तासन, शशांकासनासोबत शीतली, शीतकरी आणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्तदाब आटोक्यात येतो.

दमा, श्वासाचे आजार

शवासन, मत्स्यासन, शलभासन, सुप्तवंकासन, भुजंगासन, उष्ट्रासन, शंखपक्षालन, भस्त्रिका, कपालभाती, उज्जाई प्राणायाम प्राणप्रयोग यांचा उपयोग होतो.

जुलाब

सर्वांगासन, हलासनाबरोबर मुलबंध कार्येत्सर्ग शितली प्राणायाम करावेत.

हातासाठी  धनुरासन, बकासन, चक्रासन, उर्ध्कपद्मासन, हस्तभुजासन, कुक्कुटासन, कंकासन, लोलासन फार उपयोगी ठरतात.

पचनासाठी

पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वंकासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.

पोटदुखी

उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वंकासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे.