फ्रंट ऑफ द कॅमेरा काम करण्यातली मज्जा काही औरच! – अमोल कागणे

199

सामना ऑनलाईन । मुंबई

‘हलाल’, ‘परफ्युम’, ‘लेथ जोशी’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचानिर्मितीकार अमोल कागणे आता ‘बाबो’ या आगामीचित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत असून हा चित्रपट३१ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पदार्पणातच एक नाअनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता म्हणजे एकअजब रसायनच आहे. हा मेडिकलचा स्टुडन्ट आपल्याफावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणित्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसलीअसं म्हणता येईल. बॅक ऑफ द कॅमेरा रमणारा अमोल सध्याफ्रंट कॅमेरा एन्जॉय करतोय. पहिल्यांदाच स्वतःला हिरोच्याभूमिकेत पाहताना त्याला काय वाटतंय हे ‘बाबो’ चित्रपटाच्यानिमित्ताने सांगतोय अमोल कागणे…

निर्मितीक्षेत्रातून अभिनयक्षेत्रात का वळावं असं वाटलं?

मुळातच मला अभिनयाची आवड आधीपासून होती. निर्मितीक्षेत्रात मी चुकून आलो. हे क्षेत्र सुरुवातीला माझ्यासाठी नवीन होतं. माझं बॅकग्राउंड आणि शैक्षणिक  पार्श्वभूमी यांचा कुठेही ताळमेळ बसत नसताना मी मनोरंजन क्षेत्राशी जोडलो गेलो.  मेडिकलच्या हेक्टिक शेड्युलमधून जरा मोकळीक मिळावी म्हणून कॉलेजच्या नाटकांमध्ये काम करू लागलो. माझे आजोबा (आईचे वडील) नाटक बसवायचे त्यांचा वारसा माझ्याकडे आला असावा कदाचित. माझ्या वडिलांनी मात्र सर्वसाधारण मध्यमवर्गीय वडिलांसारखा एकच प्रश्न विचारला, ”फक्त नाटकंच करणारेस की शिक्षण पण पूर्ण करणारेस”? मी माझं मेडिकल कम्प्लिट करेनच पण नाटकसुद्धा शिकेनअसं त्याच वेळी ठरवलं, त्याप्रमाणे मेडिकलनंतर पुण्यातील ललित कलाभवन मधून नाट्यशास्त्रात पदवीदेखील घेतली. त्यानंतर हलाल चित्रपट मी शिवाजी लोटन पाटील यांच्यासोबत केला …

निर्माता आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांमध्ये फरक काय जाणवतो आणि तुला कुठली भूमिका अधिक प्रिय आहे?

फ्रंट ऑफ द कॅमेरा काम करण्यातली मज्जाच काही और आहे. एक अभिनेता म्हणून तुम्ही आणि तुमचं काम इतकंच सांभाळता. लेखकाने लिहिलेल्या संवादांना दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून एका अभिनेता म्हणून तुम्हाला प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करायचं असतं. ज्यात खूप स्किल लागतं पण ही फेज एनजॉयेबल असते. उलट बॅक ऑफ द कॅमेरा तुम्हाला एकाचवेळी खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. टेक्निकली तुम्ही खूप अडकता. त्यात एक नशा आहे अनडाऊटेडली पण रिस्कही आहे. मार्केटिंग आणि प्रमोशनची गणितं व्यवस्थित जुळली की बॅक कॅमेरा ही तुम्ही एन्जॉय करू शकता. पण हो मला फ्रंट कॅमेरा काम करायला जास्त आवडतं.

‘बाबो’ मध्ये तुझी भूमिका काय आहे आणि भविष्यात कुठल्या प्रकारच्या भूमिका तुला करायला आवडतील?

‘बाबो’ मध्ये मी लीड रोल मध्ये आहे. बबलू नावाची व्यक्तिरेखा मी साकारत असून ही भूमिका एका प्रेमात आकंठ बुडालेल्या युवकाची आहे. बबलू हा गावातला एकमेव इंजिनीअर आहे. जो सालस आणि तितकाच प्रेमळ आहे. त्याचं लहानपणापासून आपल्या मुन्नी नावाच्या बालमैत्रिणीवर प्रेम आहे पण त्याला ते सांगता येत नाही. त्याच्या मनाची तगमग मुन्नीपर्यंत पोहोचते का? मुन्नी त्याला स्वीकारते की नाही आणि जर ती हो म्हटली तर घरचे लग्नाला तयार होतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘बाबो’ देतो. बबलू साकारताना मला खूप मजा आली. याआधी नाटकांमध्ये मी मालकापासून-नोकरापर्यंत सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह दोन्ही व्यक्तिरेखा मी केल्या आहेत पण मला सर्वात जास्त ग्रे शेड करायला आवडते. त्यात मी खूप कम्फर्टेबल असतो.

आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगशील?

सध्या मी ६ मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे. काही महिन्यांच्या गॅपनंतर हे चित्रपट प्रदर्शित होतील. सध्या ‘बाबो’मी लीड हिरो असणारा चित्रपट ३१ ला मे ला प्रदर्शित होतोय. राजू पार्सेकर यांच्या ‘अहिल्या’ चित्रपटामध्ये सुद्धा मी एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ‘अहिल्या’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आणखी ही काही शोज आणि गाण्यांची ऑफर मला आलाय आहेत. लवकरच तुम्हाला माझ्यातल्या अभिनेत्याची विविध रूपे पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या