नृत्याशी तादात्म्य!

कथ्थक नर्तिका सोनिया परचुरे. त्यांना नृत्यातून परमेश्वर सगुण साकार वाटतो.

देव म्हणजे? – माझे वडील आणि काम माझ्यासाठी देव आहेत.

आवडते दैवत? – गणपती, श्रीकृष्ण आणि कुलदैवता दुर्गादेवी.

धार्मिक स्थळ? – रत्नागिरीला कळझोंडी गावात तीन नद्यांच्या संगमावर शंकराचं मंदिर आहे. ते मला खूप आवडतं.

आवडती प्रार्थना – सदा सर्वदा योग तुझा घडावा…

आवडतं देवाचं गाणं? – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.

आवडता रंग? – वांगी रंग.

धार्मिक साहित्य वाचलंय?– ज्ञानेश्वरी वाचलीय. भगवद्गीता वाचतेय.

अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – नृत्य केल्यावर.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगाल? – ही प्रत्येकाच्या मनाची अवस्था.

ज्योतिष शास्त्रावर विश्वास? – अडचण आली की आठवण येते.

नृत्यकला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – गुरूंवर भक्ती असली पाहिजे. त्यानंतर जी विद्या प्राप्त होते त्यावरही भक्ती हवी.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – पूर्वीच्या काळी कथ्थकमधला थाट देवाला स्मरून केला जायचा. तेव्हा मुसलमानांनी आपल्या मूर्ती भ्रष्ट केल्या. यामुळे नर्तक आपल्याला हवं तसं नृत्य करतील, असं त्यांना वाटत होतं. पण आपल्या नर्तकांनी मूर्तीचं रूप मनात तयार करून थाट केले. म्हणून प्रार्थना महत्त्वाची वाटते.