बाप्पा आणि स्वामी

प्रल्हाद कुरतडकर – नाटक केवळ पाहूनही त्याला आत्मिक समाधान मिळते.

n देव म्हणजे? – मी कोणत्याही देवळात ठरवून जात नाही. आपल्या पाठीशी उभे राहणारेही देवच असतात.

n आवडते दैवत? – गणपती बाप्पा.

n धार्मिक स्थळ? – ठरावीक नाही, पण गणपतीच्या दिवसांत लालबाग-परळमध्ये जे वातावरण होतं तेच माझ्यासाठी धार्मिक स्थळ समजतो. कारण या दिवसात मी अधिक भावुक होतो.

n आवडती प्रार्थना – सर्वात्मका शिव सुंदरा..

n आवडतं देवाचं गाणं? – देवा तुझे किती सुंदर आकाश… सुंदर प्रकाश.

n धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का? – नाही

n दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – योगायोगाने बऱ्याचशा गोष्टी घडतात तिथे तुमची सकारात्मकता कामाला येते. सकारात्मक दृष्टिकोनालाच दैवी चमत्कार म्हटलं जाऊ शकतं. सकारात्मक विचारच दैवी चमत्कार घडवत असतात.

n अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – नाटकाशीसंबंधित काहीही कृती केली की, समाधान मिळतं. नाटक पाहिलं तरी समाधान होतं.

n देवावर किती विश्वास आहे? – बाप्पा किंवा स्वामींची कोणतीही मूर्ती बघितली तरी खूप समाधान वाटतं आणि असा विश्वास वाटतो की, सगळं व्यवस्थित होईल.

n दुःखी असतोस तेव्हा? – दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक गोष्टी आठवतो. दुःखाची दुसरी बाजू काय याचा विचार करतो. जे होतं ते चांगल्यासाठी होतं यापुढे काहीतरी चांगलं होणार आहे याचा विचार करतो.

n नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील? – देवाला मानण न मानण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. देवाला मानू नका पण किमान स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मदतीला धावून येतो त्याला तुम्ही देव माना.

n देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुझं मत?- असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी वृत्ती नको. प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत तर देव सोबत आहेच.

n उपवास करतोस का? – नाही.

n अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता? – महाविद्यालयात असताना एकांकिकेत काम करायचो. त्यावेळी प्रार्थना म्हणायचो. त्याने मन प्रसन्न व्हायचं. बक्षीस मिळालं की, आम्ही लालबागच्या राजाचा विजय असो, असा जल्लोष करायचो. त्यामुळे त्याचा आशीर्वाद पाठीशी आहे, असं वाटतं.

n मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – प्रार्थना.