स्ट्रीट फूडची चाहती – गायिका अंजली मराठे

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ? – खाणं म्हणजे माझ्यासाठी ‘आनंद’.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – काळजी घेण्यासारखं विशेष काही करत नाही. गळ्याची काळजी घ्यावी लागते म्हणून तेलकट जास्त खात नाही. गोडही फार खात नाही.

मैफलीनिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता ? – मैफलीनंतर जेवत नाही. खूप उशिरा गाणं संपलं तरीही काही खात नाही. ऍसिडिटी टाळण्यासाठी हा नियम पाळते.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता ? – हॉटेलपेक्षा स्ट्रीट फूड खाणं बऱ्यापैकी होतं

स्ट्रिट फूड आवडतं का? – हो फारच आवडतं.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?- ठरावीक नाही

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता ? – पाहुण्यांना घरी बोलावून त्यांना खाऊ घालणं मला खूपच आवडतं. मोठय़ा संख्येने लोकं माझ्याकडे येतात. त्यावेळी सांबार, कोफ्ता करी, चाट, डोसा किंवा पारंपरिक जेवण आवर्जून करते.

खायला काय आवडतं ? चाट जास्त आवडतं. पाणीपुरी खूप आवडते

कोणतं पेय आवडतं ? वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आवडतात

उपवास करता का ? – नाही

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? भाताचे विविध प्रकार मी आवर्जून करते.

रवा-दही सॅण्डविच

एका भांडय़ात रवा दही मिसळून दहा मिनिटे ठेवा. त्यानंतर आवडीनुसार आपल्याला हवी ती भाजी ब्रेडला लावून घ्यायची. तुपावर दही आणि रवा परतून घ्यायचा. ब्रेडवरील भाजीवर हे मिश्रण पसरवायचं. वरून चवीनुसार चाट मसाला, मीठ घालायचं. वर दुसरा ब्रेड ठेवून टोस्ट करायचं. सॉसबरोबर सर्व्ह करायचं.