सोनं ते सोनंच, गुंतवणूकदारांची सोन्याकडे धाव

सामना ऑनलाईन । मुंबई

जागतिक बाजारासह मुंबई शेअर बाजारातही नाराजीची लाट आली असल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मात्र असे असले तरी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदाच झाला आहे. बाजार पडल्यानंतरी सोन्याची झळाळी कायम असून भाव चढेच असल्याचे पाहायला मिळाले.

सोन्याच्या दरांवर नजर टाकल्यास या आठवड्यात सोन्याचे भाव ३२ हजाराच्या आसपास राहिलेल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजारात पडझड असली तरी शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत ३२,३८९ इतकी होती. दुपारनंतर सोन्याचे भाव खाली आल्याचे पाहायळा मिळाले. मात्र ही घसरण फार मोठी नसल्याने सोन्यातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.