सर्व देशांना सहभागाची हमी नाही तोपर्यंत यजमानपद नाही, आयओसीने हिंदुस्थानला बजावले

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे हिंदुस्थानने सर्व पातळीवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून नवी दिल्लीतील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पाकिस्तानच्या दोन नेमबाजपटूंना व्हिसा नाकारत पाकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)हिंदुस्थानला अल्टिमेटम देताना म्हटले की, जोपर्यंत सर्व देशांतील खेळाडूंना सहभागाची हमी देण्यात येत नाही तोपर्यंत हिंदुस्थानला कुठल्याही ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धांचे यजमानपद भूषवता येणार नाही. आयओसीने या स्पर्धेतील दोन कोटा रद्द केले आहेत. या स्पर्धेतील 14 ऑलिम्पिक कोटा कायम ठेवण्यात आला आहे.