आयफोन महागला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अॅपलचे आयफोन महागले आहेत. सरकारने सीमाशुल्क १५ टक्क्यांवरून २० टक्के केल्याने अॅपलने आयफोनच्या किमतीत ३ टक्के वाढ केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. अॅपलने दरवाढीला दुजोरा दिला असून त्याबाबत बेवसाइटवर माहिती दिली आहे. लवकरच सर्व आयफोनच्या किमती वेबसाइटवर अपडेट केल्या जाणार आहेत.

आयफोन एसई’ हा हिंदुस्थानात विस्ट्रोनद्वारा असेम्बल करून बनवला जातो. त्यामुळे त्याची किंमत वाढणार नाही. आयफोन २५६ जीबी वॅरिएंटची किंमत एक लाख ५ हजार ७२० रुपये होती ती आता एक लाख ७ हजार ९३० रुपये झाली आहे. याशिवाय ‘आयफोन ६’ आणि ‘आयफोन ६ एस’च्या किमतीत ११०० रुपये आणि १३५० रुपये इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही फोन अनुक्रमे ३१, ९०० रुपये आणि ४२,९०० रुपयांना मिळतील.