तुमच्याकडे आयफोन आहे ? मग तुम्ही श्रीमंत आहात

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

तुम्ही आयपॅड किंवा आयफोन वापरत असाल तर तुम्ही जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहात असा दावा एका सर्वेक्षणाअंती संशोधकांनी केला आहे. ही दोन उत्पादने वापरणे म्हणजे श्रीमंतीचे प्रतीक आहे असं या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. मारियन बरट्रान्ड आणि एमिर कामिनेका या दोन अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी केलेल्या अहवालाद्वारे हा दावा केला आहे.

या दोन संशोधकांचं म्हणणं आहे की इतर कोणतीही वस्तू किंवा ब्रँड असा नाहीये जो श्रीमंतीचं प्रतीक बनू शकेल. २०१६ आयपॅड आणि २०१७ साली आयफोन दोन पैकी एक गोष्ट ज्यांच्याकडे होती त्या व्यक्ती श्रीमंत असल्याचं लक्षण असल्याचं या संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या व्यक्तींकडे ही दोनपैकी एक उत्पादन आहे ते श्रीमंत असल्याचं सिद्ध होण्याची शक्यता ६९ टक्के अधिक असते असं अहवालात म्हटलंय. अँड्रॉईड फोन किंवा व्हेरीझोनचे फोन वापरणारी व्यक्तीही चांगली कमावणारी व्यक्ती असू शकते मात्र आयफोनधारकांच्या तुलनेत ते कमी कमाई करणारे असतात असं ढोबळ चित्र या संशोधकांनी मांडलं आहे. अँड्रॉईड फोनच्या तुलनेत आयफोन अजूनही महाग असून जगातील श्रीमंत व्यक्ती कोण हे ठरवण्यासाठी हाच निकष असल्याचं या संशोधकांनी ठासून सांगितलंय. या संशोधकांनी ६,३९४ व्यक्तींची मते जाणून घेतली आणि त्यानंतरच हा निष्कर्ष काढला आहे.