तिघांचा २४ कोटी रुपयांच्या ३०० ‘आयफोन-X’वर डल्ला

सामना ऑनलाईन । सॅन फ्रान्सिस्को

जगभरामध्ये ‘आयफोन-X’ खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असताना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तिघांनी मिळून ‘आयफोन-X’ने खचाखच भरलेल्या ट्रकवर डल्ला मारला. तीन चोरांनी मिळून अॅपल स्टोअरबाहेर उभ्या असलेल्या ट्रकमधून तब्बल ३ लाख ७० हजार डॉलर म्हणजेच २४ कोटी रुपयांचे ३०० पेक्षा जास्त ‘आयफोन-X’ चोरी केले. पोलिसांना अद्यापही आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान ‘आयफोन-X’चा ट्रक पार्क करून चालक फोनची डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी निघून गेला. चालक निघून गेल्यानंतर तीन चोरांनी संधी साधून ट्रकचे लॉक तोडले आणि ३१३ ‘आयफोन-X’ चोरी केले. याप्रकरणी पोलीस आणि अॅपल कंपनी मिळून तपास करत आहेत.