‘हे’ आहेत आयपीएलमधील ‘नर्व्हस नाईन्टी’

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलच्या ११ व्या हंगामाची रंगत आता वाढत चालली आहे. ८ टीममधील या रनसंग्रामात सर्वच टीमचे फलंदाज आपल्या बॅटचं पाणी प्रतिस्पर्धी टीमला पाजण्यासाठी धडपडत आहेत. या स्पर्धेत आजवर या खेळाडूंनी नव्वदी पार केली असली तरी त्याना शतक झळकावता आलेले नाही.

श्रेयस अय्यर –

shreyas-ayyar

दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद स्विकारल्यानंतर पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरने तुफानी फलंदाजी केली. श्रेयसने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अवघ्या ४० चेंडूत ३ चौकार आणि १० षटकार खेचत नाबाद ९३ धावा काढल्या. निर्धारीत २० ओव्हर्सचा खेळ संपल्यानेच श्रेयसला शतक झळकवता आले नाही.

रोहित शर्मा-

1

पहिल्या तीन सामन्यात शांत असलेली रोहित शर्माची बॅट रॉयल चॅलेजर्स बंगळुरुविरुद्ध चांगलीच तळपली. घरच्या मैदानात नेहमीच्या थाटात त्याने बंगळुरुच्या आधीच कमकुवत असलेल्या गोलंदाजीच्या मर्यादा पुन्हा उघड केल्या. फॉर्मात असलेला रोहित शतक झळकवार असा अंदाज होता. पण शेवटच्या षटकात तो ९४ धावांवर बाद झाला.

विराट कोहली-

2

रोहित शर्माच्या ९४ धावांच्या खेळीला रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने बॅटनेच चोख उत्तर दिले. एका बाजूला सहकारी परतत असताना कोहली दुसऱ्या बाजूने ‘विराट’ रुपात होता. विराटलाही या सामन्यात शतक पूर्ण करता आले नाही. तो ९२ धावांवर नाबाद राहिला.

संजू सॅमसंग-

4

राजस्थानचा युवा फलंदाज संजू सॅमसनची बॅट किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध चांगलीच तळपली. अर्धशतकानंतर शतकाच्या दिशेने वेगाने सुरु असलेली संजूची वाटचाल ९१ धावांवरच थांबली. त्याचे शतक ९ धावांनी हुकले.

जेसन रॉय-

3

दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या या स्पर्धेत एकमेव विजयाचा जेसन रॉय हा शिल्पकार होत. या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात शतक झळकवण्याची संधी जेसन रॉयला होती. रॉय ९१ वर होता त्याचवेळी दिल्लीने विजयाचे लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे या स्पर्धेतील पहिला शतकवीर होण्याची संधी रॉयला साधता आली नाही.