आयपीएलच्या आधी क्रिकेटपटूने झटपट उरकलं लग्न, गर्लफ्रेंड बनली पत्नी

nitish-rana-marriage

सामना ऑनालाईन । नवी दिल्ली

मुळचा दिल्लीचा पण आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा आणि स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला तरुण क्रिकेटपटू नितीश राणा याने आपली गर्लफ्रेंड साची मारवाह हिच्या सोबत लग्नाची गाठ बांधली आहे. बऱ्याच काळापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि सोमवारी त्यांनी मैत्रीला पतीपत्नीच्या नात्यात आणखी घट्ट केले. यावेळी नितीशला शुभेच्छा देण्यासाठी दिनेश कार्तिक, उन्मुक्त चंद, ध्रुव शौरी हे क्रिकेटपटू तर कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वैंकी मैसूर आणि प्रशिक्षक अभिषेक नायर असे बडे चेहरे उपस्थित होते.

2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणावर 3 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले होते. कोलकाताच्या आधी नितीश हा मुंबईकडून खेळत होता. गेल्या आयपीएलमध्ये जखमी असलेल्या राणाला सर्व सामने खेळता आले नव्हते. पण यंदा त्याला चांगला खेळ करून आपले स्थान कायम ठेवणे आवश्यक असणार आहे.